उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, उपनेते तथा संपर्कप्रमुख मा.मंत्री आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब, जिल्हाचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळकरंजा ता.कळंब येथिल ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच विलास महादेव मोहिते गावातील प्रमुख नेते बाळासाहेब जाधव, नानासाहेब पाटील, शरद गालट, धनंजय कराड, नितीन गोडसे, आनंत लोमटे, बळी मुंडे, बाळासाहेब लोमटे, प्रकाश गोडसे, सुधाकर मुळे, उमराव चव्हाण, अविनाश सारंग, मधुकर वाघमारे, रमेश तपिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी धाराशिव(उस्मानाबाद)चे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळक, भारत काका देशमुख, रवी कोरे आळणीकर, महादेव मगर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.