भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काका पाटील यांच्या सारखा घातकी मित्र कोणाच्या वाट्याला येऊ नये असा आरोप माजी आडमार विलास जगताप यांनी लगावला आहे. 2019 साली संजयकाका पाटील यांनीच मला बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि त्यांनीच मला पाडले, असा गंभीर आरोप माजी आमदार विलास जगताप यांनी केला.
यावेळी विलास जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली. संजय काका पाटील हे फसवणारे नेते आहेत. माझी इच्छा नसताना २०१९ ला त्यांनी मला पुन्हा निवडणुकीला उभा राहण्यास सांगितलं. मात्र, मला पाडायला सुद्धा त्यांनीच षडयंत्र केलं. आज संजय पाटील सारखी खोटे बोलणारे अनेक लोक आपल्याला आयुष्यात भेटतात अशा फसवणाऱ्या लोकांच्या पासून सावधान रहा. जत तालुक्यातील या गावात विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका यांच्यावर तोफ डागली.
जगताप पुढे म्हणाले की, संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. पण संजय पाटील यांच्यासारखा घातकी मित्र आयुष्यात कधी कोणाला मिळू नये. माणसाच्या मागे किती मतं आहेत, हे महत्त्वाचे नाही. परंतु, त्या माणसाचे विचार कसे आहेत, हे महत्त्वाचं असतं. जय-पराजय कोणाचे होत नाही, मी सुद्धा दोनदा पराभूत झालो आणि एकदा आमदार झालो. मला पण काम करायची संधी मिळाली. पण संजयकाका पाटील यांच्यासारख्या घातकी मित्रांपासून सावध राहणे हे फार गरजेचे असल्याचे विलास जगताप यांनी म्हटले.