केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवरून भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. अशातच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एक धमका करण्याच्या तयारीत आहे. खेळ नुकताच सुरू झाला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे, असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले.
ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. अल्पसंख्यांक नवाब मलिक यांना अटक झाली. तसेच मंत्री तनपुरे यांची मालमत्ता जप्त केली त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बॅकफुटवर गेले होते. आता पुन्हा एकदा राऊत मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.
खेळ नुकताच सुरू झाला आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय एजन्सीजच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी ‘वसुली एजंट्स’मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले. जे काही पुरावे दिले आहे, त्याचा अधिक तपशील शेअर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय राऊतांनी सांगीतले.