(मुंबई प्रतिनिधी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारवर दबावतंत्रचा वापर करून राठोड यांचा राजीनामा मागितला होता. तसेच शनिवारी भाजपाच्या महिला मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात याच मुद्द्यावरून आंदोलन सुद्धा केले होते.
याच पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तर विदर्भातून होणार नव्या वनमंत्र्याची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता संजय राठोड राजीमाना देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १ मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. राठोडामुळे अधिवेशनात गदारोळ होणार अशी चर्चा देखील सुरू आहे.