राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं असल्याचं समोर आलं आहे. आज 12 वाजता संभाजीराजे वर्षावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगावा राजेंनी स्वीकारला असून राज्यसभा सहाव्या जागेच्या मुद्द्यावर महत्वाचं वळण लागलं आहे.
संभाजी राजेंनी वर्षावर जाण्याचं निमंत्रण स्वीकारलं असलं तरी ते उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. तसेच राजे मातोश्रीचा चक्रव्यूह संभाजी राजे भेदू शकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे.
यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.