उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी भाष्य केले आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.
पुढे बोलताना कदम म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८८ आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपाने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. पण ती मागणी मान्य करण्यात आलेली नव्हती.
मात्र, महाविकासआघाडी सरकारने मागणी मान्य न करता वाझे यांची बाजू घेतली होती. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे आघाडी सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राम कदम यांन केली.मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असे ही राम कदम यांनो बोलून दाखविले होते.