आमदार गोपीचंद पडळकर सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. दरम्यान पडळकर हे आज जालना जिल्ह्यातील काजळा गावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपस्थित नागरिकांना संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “पालकमंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षा मोठा घोटाळा केला. आरोग्यमंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना? अशा कचाट्यात आरोग्यमंत्री अडकले होते. यांचा परीक्षा घोटाळा आम्ही येणाऱ्या अधिवेशनात बाहेर काढणार आहोत.” त्यामुळे पुन्हा एकदा रास्तवराडी आणि पडळकर असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
“परीक्षा सेंटर देताना मुंबईच्या मुलांना जालना सेंटर असं कुठं झालं का? न्यासा सारख्या ब्लॅक लिस्ट कंपनीला आम्ही नकार देत असताना यांनीच, न्यासा सारख्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम दिल. त्याचं न्यासा कंपनी वाल्यांनी गोलमाल करत आत्ता यांना कचाट्यात अडकवले. आरोग्य मंत्री आणि न्यासा कंपनीने संगनमत करून हा घोटाळा केला”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.