राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये करोना निर्बंध अद्यापही पूर्णपणे शिथिल करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र निर्बंधांवर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे
‘काही ठिकाणी जिथे रुग्ण वाढताहेत तिथे काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात जितके रुग्ण कमी झाले होते, तितके कमी झालेले नाहीत. पुढच्या काही दिवसात आपल्याला निर्बंध शिथिल होताना दिसतील. हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल.
दुसरीकडे, लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना हायकोर्टाने ठाकरे सरकारला केली आहे. हायकोर्टात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली. दरम्यान गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.