आमदार प्रसाद लाड यांनी mahim येथे भाजपा कार्यलहचये उदघाटन करताना वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. , आता प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली पण संजय राऊत सारख्या सोंगाड्यावर बोलणं उचित वाटत नाही, असं म्हटलं आहे.
कालच्या वक्तव्यानंतर मी माझा एक व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमांना दिला होता. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलं आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुखांवर प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या शिवसेना प्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र, पुढे त्यांना अरेला कारे करायची आमची तयारी आहे, असा इशारा देखील दिला आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा दिलगिरी व्यक्त केलेला व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. राहिली गोष्ट संजय राऊत यांची.तर राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.