मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरकनायिके यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचे आव्हान केले होते. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी सावध राहण्याचा सल्ला दिला होता. यावर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला होता. आता राऊत यांच्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
“शरद पवारांच्या पे रोलवर राहून उठसूट पवारांच्या समर्थनार्थ बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय मनोगत ते तुम्हा मांडा. शिवसैनिकांचं मनोगत असं आहे की, आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी तो संदेश दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे जी युती होती त्यात आम्ही समाधानी होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं हे अनैसर्गिक आहे, हे सर्वसामान्य शिवसैनिकाचं मत मांडत नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरनाईक प्रकरणावर बोलताना पाटील म्हणले की, प्रताप सरनाईक यांनी पत्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी देखील तो आरोप केला आहे. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी काही तरी घडल्याशिवाय कोणी त्रास देत नाही. काही तरी घडलं असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.