सुरक्षितेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहील गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेच्या मुद्दय़ावर वाटाघाटी नकोत. तर पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करण्याची ठोस भूमिका आता घ्यावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
भारताच्या सीमेवर चिनी सैन्याची घुसखोरी सुरू आहे. लडाख सीमेवर पँगाँग सरोवराजवळ चीन पूल उभारत असल्याचे उघडकीस आले आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विट करत हिंदुस्थानात चीनची घुसखोरी सुरू असतानाही केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याकडे लक्ष वेधले आहे. चीनने पँगाँगकर पहिला पूल बांधला.
केंद्र सरकार म्हणते, आम्ही परिस्थितीकर लक्ष ठेकून आहोत. चीनने पँगाँग सरोवरात दुसरा पूल बांधला. केंद्र सरकार म्हणते, आम्ही परिस्थितीकर लक्ष ठेकून आहोत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर अशी मिळमिळीत आणि समझोत्याची भूमिका घेऊन प्रश्न सुटणार नाही. तर पंतप्रधानांनी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे असे मत यावेळी राहुल गांधी यांनी मांडले आहे.