आजच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार देशाला काही दिवसांतच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आज काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी याच निवडणुकीबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून भेट घेतली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार असावा, यासाठी सोनियांनी सांगितले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, मतता बॅनर्जी, डीएमके, सपाच्या नेत्यांची चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यांच्या सांगण्यावरुन पवारांना भेटण्यासाठी आलो होतो. सोनियांची इच्छा सांगितली. सगळ्या पार्ट्यांनी, एकत्र येऊन, चर्चा करुन त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत मिटिंग होत नाही, तोपर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार नाही. बैठकीनंतरच नाव निश्चित करण्यात येईल. असे खरगे या बैठकीनंतर म्हणाले आहेत.
राष्ट्रपदीपदासाठी विरोधकांकडून एकच उमेदवार असावा यावर एकमत झाल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले आहे. समविचारी पक्षांना एकत्र करण्याची गरज आहे. अनेकांना विचारावे लागेल. आजचे सगळे लक्ष 10 आणि 19 या तारखांवर आहे. बाकीचे सहकारी ठरवतील त्या दिवशी बैठकीला जाऊ, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या खर्गेंच्या भेटीनंतर पवारांनी दिली आहे.