मुंबई | राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी इडीने मलिकांच्या एकूण ८ मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मलिकांच्या कुर्ला पश्चिममेतील एक व्यवसायिक जागा, कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त, वांद्रे पश्चिममधील २ फ्लॅट्स, ठाण्यातील मालमत्ता आणि उस्मानाबादमधील १४८ एकरची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेली मलिकांची मालमत्ता ही त्यांच्या नावावर आणि त्यांच्या कंटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती मिळली आहे.
मलिकांना ईडीने दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी अटक केली असून मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला असून त्यांनी मलिकांना ही जमीन ५५ लाखाला मिळाली होती. या जमिनीची सध्याची किंमत ३०० कोटीची असल्याची माहिती ईडीच्या तपासातून मिळाली आहे. यात गैरव्यवहारच्या पार्श्वभूमीवर ईडीने मलिकांना २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेहण्यात आले होते. यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना ईडीच्या कोठडीत सुनावली.