स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम.के. स्टॅलिन यांनी नेमके काय साध्य केले? राजीव गांधी यांची हत्या हा धक्काच होता, पण गांधींच्या खुन्यांचा सन्मान हा त्यापेक्षा मोठा धक्का आहे. राजकारणासाठी ‘वाट्टेल ते’ हे प्रयोग कधी थांबणार? नव्हे, ते थांबायलाच हवेत. पंतप्रधानांच्या खुन्यांना प्रतिष्ठा देणे हा घातक पायंडा आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या नव्या पायंड्याला विरोध करायला हवा. असे शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
राजकारण कितीही अमानुष असले तरी किमान सभ्यता व सुसंस्कृतपणा टिकवायलाच हवा. दुर्दैवाने आज तसे घडताना दिसत नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगार ए. जी. पेरारिवलन याची 31 वर्षानंतर कोर्टाने सुटका केली. राजीव गांधी हत्या प्रकरणात पेरारिवलन यास 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. खरे तर आधी त्यास फाशीच ठोठावण्यात आली होती. पण आजन्म जन्मठेपेपर्यंत शिक्षा झाली. आता 31 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने त्याची सुटका केली. पेरारिवलनच्या आईने आपल्या मुलासाठी मोठी कायदेशीर लढाई केली. त्यात तिला अखेर आले.
निवडणूक प्रचार असताना तामीळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर ‘लिट्टे’च्या मारेकऱ्यांनी मे, 1991 मध्ये गांधी केली. मानवी बॉम्बचा त्यासाठी झाला. बॉम्ब बनविण्यासाठी शक्तिशाली बॅटरी बनविण्याचे व पुरविण्याचे काम पेरारिवलन याने केल्याचा आरोप आता पेरारिवलन वर्षांनी सुटला पण पेरारिवलन सुटल्याबरोबर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्या भेटीस गेला. दोघांनी गळाभेट घेतली. स्टॅलिन पेरारिवलनचा सन्मान पेरारिवलन याचा उल्लेख स्टॅलिन यांनी ‘भाई’ केला. पेरारिवलनला उत्तम भविष्य असल्याचे विधान यांनी करावे आश्चर्यच आहे. अशी टीका शिवसेनेने केली आहे.