“रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर कोणाला रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये,” अशी भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी १० मे रोजी नंदिनीनगर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती.
या सभेत राज ठाकरेंनी अयोध्येत पाऊल ठेवण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंनी उत्तरप्रदेशात प्रवेश करून नये. राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ५ लाख लोक जमवणार, अशी भूमिका ब्रिजभूषण सिंहांनी त्यांनी घेतली आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर पत्रकारांनी प्रश्नवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोध करण्याचे ब्रिजभूषण यांचे काय कारण आहे, हे मला माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. माझे एक स्पष्ट मत आहे की, रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर त्यांना रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये. कोणाला विरोध करण्याचे कारण नाही. मला ब्रिजभूषण यांच्याशी चर्चा करण्याची काही अवश्यकता नाही.”