अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पोलिसांनी पॉर्न फ्लीम प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. सध्या या प्रकणात नवीन-नवीन खुलासे होत असून अनेक अभिनेत्रींनीं त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. तसेच शिल्पा शेट्टी हीची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार राम कदम ह्यांनी सुद्धा कुंद्रावर गंभीर आरोप लावले आहेत.
राज कुंद्राने ऑनलाईन गेमिंग्च्या माध्यमातून ३ हजार कोटीचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला आहे. राज कुंद्राची कंपनी वियान इंडस्ट्रीने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली असल्याचे गंभीर आरोप राम कदम यांनी केला आहे.
राम कदम पत्रकार परिदेत म्हणाले की, राज कुंद्राने ऑनलाईन गेमच्या प्रचारासाठी पत्नी शिल्पा शेट्टीचा फोटो आणि नावाचा उपयोग केला होता. तसेच राज कुंद्राने ऑनलाईन गेम (GOD) गैम्बलिंग गेमच्या माध्यमातून हजारो करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. पैसे जमवणे आणि पैशांच्या वितरणामध्ये गरिबांची फसवणूक केली आहे. शिल्पा शेट्टीच्या प्रसिद्धीचा आम्ही सन्मान करतो परंतू गेमचा प्रचार करण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा वापर राज कुंद्राने केला आहे.
राम कदम यांनी पुढे म्हटलं आहे की, गेमच्या वितरणामध्ये आणि पैशांच्या व्यवहारात मोठी फसवणूक कऱण्यात आली आहे. गेमच्या वितरणामध्ये कोणाकडून ३० लाख तर कोणाकडून २० ते ३० लाख असे पैसे आकारले गेले. काही लोकांनी डिस्ट्रीब्यूटरशीप घेतली तर यामधील काही लोकांना कळाले की यामध्ये फसवणूक करण्यात येत आहे. अशा प्रकारे राज कुंद्रा लोकांची फसवणूक केली होती.
