नवी दिल्ली | पुन्हा एकदा भाजपा नेता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. चर्चेदरम्यान जेव्हा अँकरने काँग्रेस नेते गजेंद्र सिंह सांखला यांना एक प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. नविका कुमार यांनी “सवाल पब्लिक का” कार्यक्रमात गजेंद्र सांखला यांना तस्लीम रहमानी यांचं म्हणणं आहे तशीच काँग्रेसची विचारसरणी आहे का? असा प्रश्न विचारला होता. “तुम्हीही त्या विचारसरणीशी सहमत आहात का जी म्हणते या देशाची निर्मिती मुघलांनी केली आहे, बाबरने केली आहे? काँग्रेस पक्ष याच्याशी सहमत आहे का?” असं विचारलं.
गजेंद्र सांखला यांनी यावर उत्तर देताना “मोहेंजोदडोच्या काळात दगडातून आग निर्माण केली जात होती आम्ही असं मानतो. त्यावेळी तितका विकास झाला नव्हता असं तुम्हीच मानता. गेल्या सात-साडे सात वर्षांपासून भाजपाचे हे प्रवक्ते वारंवार काँग्रेसने काहीच काम केलेलं नाही सांगत असतात” असं म्हटलं. यावरून भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी टोला लगावण्यास सुरुवात केली.
“काँग्रेस मोहेंजोदडोमध्ये काय करत होती? मला हे समजत नाही आहे. राहुल गांधी मोहेंजोदडोमधून आले आहेत का? काय बोलत असता तुम्ही सांखला साहेब.तुमचं म्हणणं पूर्ण कधी होणार, चर्चा आता संपायला आली आहे” असं म्हटलं आहे. मोहेंजोदडो, राहुल गांधी, काँग्रेसवादी.कमाल आहे. राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात” असं देखील संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.