नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीची चर्चा होती.
मात्र, पवार आणि बॅनर्जी यांची भेट काही होऊ शकलेली नाही. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनीच या भेटीबाबत माहिती दिली.
ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली. राहुल गांधी यांच्यासोबत आमची एक भेट राहिली होती, त्यांच्या मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या आहेत. त्यांनी, मी लवकरच महाराष्ट्रात येईन, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
आमची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्यात काही उत्सुकता होती. त्याबाबतही त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. जे शिवसेनेने केले ते योग्य केले. त्याचा मालकी हक्क कुणाकडे नाही.२०२४ मध्ये युतीच्या प्रश्नांवर जी काही चर्चा झाली आहे त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.