मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन (९ मार्च) असून मनसेची स्थापना होऊन आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी मनसेचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान २००६ साली शिवसेना सोडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. दरम्यान दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी हा कार्यक्रम पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे ज्या ठिकाणी सभा होणार आहे तेथे येणार्या महिला पांढरा फेटा आणि भगव्या साड्यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच साधारणत ८ ते १० हजार मनसैनिक पुण्यात येणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान काही दिवसातच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसैनिकांना काही बोलतात का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.