पुणे | पुणे:पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग जाहीर झाले आणि निवडणुकीचे बिगुल फुंकले गेले, ५८ प्रभागात एकूण १७३ जागांसाठीसाठी ही निवडणूक होणार असून कोणता पक्ष बाजी मारणार हिच चर्चा सगळी कडे चालू आहे अश्यातच आपल्याला काही चुरशीच्या लढती बघायला मिळतील अश्याच एका लढतीची चर्चा पुण्यातल्या विद्यमान महापौर यांच्या प्रभाग क्रमांक ३३ बावधन खुर्द – महात्मा सोसायटी येथे सुरु आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ बावधन खुर्द-महात्मा सोसायटी मधून लढण्याची शक्यता असून, किमया हॉटेल (पौड फाटा, कर्वेरस्ता) ते भूगाव असा सुमारे २९ चौरस किलोमीटरच्या परिसरात हा प्रभाग पसरला आहे.याच प्रभागात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात मराठी चित्रपट सृष्टीतील एका दिग्गज कलाकाराने रिंगणात उतरायच ठरवल आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे राज्य उपाध्यक्ष पद भूषवणारे रमेश परदेशी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष घालून पक्ष संघटन मजबूत करायला सुरवात करताच “शाखा अध्यक्ष”हे पद रमेश परदेशींनी जेव्हा मागून घेतले तेव्हाच ते महानगरपालिका सभागृहात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे सर्वांच्या लक्षात आले होते त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असे म्हंटले जात आहे.
