मुंबई | एकीकडे १०० कोटी हप्ता वासूचीच्या आरोपांमुळे गोत्यात आलेले आणि आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले अनिल देशमुख यांच्या अधकनी कमी होत नाही तोवर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप लावले आहे.
प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. एखाद्याच्या मागे ईडी लागली की त्याचा काळ बदलतो.
तसेच ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत. ईडी-कॅग अधिकाऱ्यांनी एका आमदारांची २ तास चौकशी केली होती. ईडीने जप्त केलेले SRA फ्लॅट डेव्हलप करायला दिले आहेत. आता जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी पुढे आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना माझा प्रश्न आहे. कोण हा कलमे त्याचा तुमचा संबंध काय हे सांगा’ आ प्रश्न आता सोमय्या यांनी विचारला आहे.