भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्लीत पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेची सुरुवात मुंडेंनी भाजपच्या बैठकित झालेल्या चर्चेने केली. पक्षांतर्गत विषयांवर भाजपच्या बैठकित सकारात्मक चर्चा झाली. राजकीय पाऊल आम्ही जेवढे भक्कम उचलतो, तेवढी सामाजिक पावले देखील भक्कम उचलली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे पाच राज्यातील निवडणुका- निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा आहे पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळालेला आहे ते आरक्षण ५० टक्क्यांच्या वर झालं होतं तर ५० टक्के आरक्षण रद्द होईल अशी शंका असताना सर्वच आरक्षण रद्द झालं म्हणूनच महाराष्ट्रात ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. त्याच्यातून आम्ही वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय भूमिकेतून बोललो आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते
तर दुसरीकडे मराठा समाजाचं आरक्षण दिलेले होते ते देखील रद्द झालेला आहे म्हणून मराठा समाज देखील नाराज झाला आहे. म्हणूनच आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजासमोर देखील मोठा प्रश्न उभा आहे. तर काही राज्यांनी आपापल्या लेव्हलवर निर्णय घेतले आहे त्यांच्या राज्याच्या एकूण संख्येवर त्यांनी निर्णय घ्यायला हवेत अशा प्रकारची व्यवस्था देखील आहे असे देखील मुंडे दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.शेवटी घटना राज्याचे आणि केंद्राचे अधिकार फार क्लियर आहे.