मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यात आली तसेच नंतर सोडण्यात आले होते. या प्रकरणामुळे नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना राणेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
बुधवारी राज्यभरात शिवसैनिक राणेंविरोधात रस्त्यावर उतरले. हिंगोलीत नारायण राणेंचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत राणेंचा निषेध केला. राणेंवर टीका करताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली. त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली. नारायण राणेंचा कोथळा काढण्याची भाषा यावेळी बांगर यांनी केली.
‘अरे तू काय सांगतो, कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा पोलीस बंदोबस्त थोडा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन चारीमुंड्या चीत करेल. तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही,’ अशी अतिशय प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह टीका बांगर यांनी केली
https://twitter.com/098Sanjay/status/1430342155130707971? .