पूजा कजव्हाण आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी गडावर मोठया प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले होते. यानंतर गडावर जमलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिले होते. याच मुद्द्यवरून विरोधकांनी सुद्धा आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र आता याच संबंधातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बातमीमुळे एकचं खळबळ उडाली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर १५ दिवस गायब झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी दोनच दिवसांपूर्वी पोहरादेवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन धुडकावून लावत राठोड यांच्या समर्थनार्थ प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी जमवली होती. या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता ती भीती खरी ठरताना दिसू लागली आहे.