राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे पिता-पुत्र सोडताना दिसत नाही. या टिकेला शिवसेना नेते सुद्धा सडेतोड उत्तर देताना दिसून येत असतात, त्यातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे.
‘नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असंच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही असा टोला जाधव यांनी लगावला होता.
आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण राणेंबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,’ असं भास्कर जाधव म्हटलं आहे. आता या टीकेला नारायण राणे काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.