राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या टीकेला आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. ज्यांना कधी १० खासदार निवडून आणता आले नाही ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार ? पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा? असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचावर जहरी टीका केली आहे.
दरम्यान, शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी नागपुरात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ‘पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून कोण व्यक्ती पर्याय बनू शकते हे महत्त्वाचे नाही.
सद्या विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांचा या भूमिकेवर राणे यांनी ट्विट करत टीकेची झोड उठवली आहे.