असाच नवरा सात जन्मी मिळू दे म्हणून महिला वाटपौर्णिमेचा उपवास पकडून वडाला प्रदर्शिना घालतात मात्र पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून औरंगाबादेत घटना घडली आहे पत्नीपीडित पतींनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको म्हणून पिंपळाला फेऱ्या मारत यमराजाकडे मनोकामना केली औरंगाबाद येथे केली आहे
महाराष्ट्रात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र, पत्नी पिडीत पुरुषांनी आता आपल्याला ही बायको नको म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत फेऱ्या देखील मारल्या आहेत.
दरम्यान, पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. सोबतच पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन देखील केले आहे. तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा सदर पुरुषांनी निषेध देखील केला. दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नव-यांना मदत करण्याचे काम करते. यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.