नवी दिल्ली | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसून येत नाही. त्यातच आता पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. ते नवी दिल्ली येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परिक्षेत ते पास झाले आहेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. काही गणितं केंद्राने सोडवली आहेत आता काही गणितं राज्य सरकारने सोडवावीत, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
लोकल रेल्वे सर्व सामन्यांना सुरू करण्याचा निर्णय एक मिनिटात घेऊ. राज्याने फक्त अहवाल पाठवावा. आम्ही राज्य सरकारच्या अहवालाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असं रावसाहेब दानवें यांनी यावेळी सांगितलं होत. राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.