पश्चिम बंगालमधील बैरकपूरचे भाजपचे खासदार अर्जुंन सिंह यांनी पक्षाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बँनर्जी यांच्या उपस्थितीत सिंह यांनी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. अर्जुंन सिंह यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते सध्या भाजपचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
तसेच सिंह हे भाटपारा येथून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपला रामराम केल्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या 11 महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमधील पाच मोठय़ा नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एसी केबिनमध्ये बसून राजकारण होऊ शकत नाही.
भाजप हा एसीमध्ये बसणाऱयांचा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला येथे काम करता येत नाही. राजकारण करायचे असेल तर लोकांमध्ये जायाला हवे. त्यासाठीच आपण भाजप सोडत असल्याचे अर्जुंन सिंह यांनी सांगितले. सिंग यांच्या या निर्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून यावर आता भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.