मागच्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकानावर अरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत अशातच आता राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला, राष्ट्रवादीची संकल्प सभा, राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत, याला जबाबदार ठाकरे सरकार असल्याचे सांगत त्यांनी आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शनिवारी कोल्हापुरात संकल्प सभा पार पडली, या सभेबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच बड्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला होता.
माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्ही भाषण दाखवत नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्यावर बोलावे लागेल, जयंत पाटील अजित दादांना हिमालयात सोडायला जातो असं म्हणतात, पण पवारांनी काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन असं म्हटलं होतं, याचा मात्र त्यांना विसर पडला आहे. यावर जयंत पाटलांनी पहिल्यांदा शरद पवारांना हिमालयात जाण्याबाबत विचारावं असं पाटील म्हणाले.