मुंबई | पाच राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष निकालावर आपले मत मांडताना दिसून येत आहेत अशातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांनी यावर भाष्य करत थेट उत्तरप्रदेश निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना पक्षाला टोला लगावला आहे. रिपाई पक्षाने सुद्धा यावेळी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
इतर राज्यात माझा पक्ष शिवसेनेपेक्षा स्ट्राँग असून मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा उमेदवार फक्त 183 मतांनी पराभूत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेत शिवसेनेला ३-४ जागा तरी येतील की नाही ही शंका असून विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
यासोबतच पंजाबमध्ये आम्हाला सत्ता मिळेल अशी परिस्थिती नव्हतीच, परंतु अकाली दल आमच्यासोबत आला असता तर सत्ता मिळाली असती आणि आप ४० जागेच्या पुढे गेले नसते असं त्यांनी मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन मायावती यांनाही टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा जनाधार रिपब्लिककडे वळत असून दलितांचे २५ ते ३० टक्के मतं भाजपला मिळाल्याने आमचा विजय झाला, असं रामदास आठवले म्हणाले.