मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी पूर्णपणे तुटून पडली आहे अशातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांना अलीकडेच ह्रदयविकाराच्या सौम्य धक्का आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आज आजच्या सभेत बोलत असताना धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवट राव आधी भाजप विरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असा सणसणीत टोल धनंजय मुंडे यांनी लगावला.