भारतीय जनता पक्षाचे नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त विधाने करून स्वतःच्या अडचणीत अधिक वाढ करून घेतली होती . याच दरम्यान आता नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेत भर पडली आहे.
कोरोनातून बरं होण्यासाठी अजब उपाय केले जात आहेत. विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच आता भाजपा नेत्यांच्या विधानांची मोठी भर पडताना दिसून येत आहे. ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलेलं असताना भाजपा नेत्याने एक अजब विधान केलं आहे. “लिंबाच्या रसाने कोरोना पळून जाईल” असं म्हटलं आहे.
माजी मंत्री देवी सिंह भाटी यांनी कोरोनावरील उपायांबाबत अजब विधान केले. “लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” असा दावा त्यांनी केला. जोधपूर सर्किट हाऊस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना असं म्हटलं आहे. त्यांच्या या द्विवाहांवरून नव्या चर्चेला उधाण येणार आहे,
“लिंबाच्या रसाचे दोन थेंब हे नाकामध्ये टाका आणि पाच सेकंद ठेवा, पाच मिनिटांनंतर कोरोना हळू हळू कमी होईल. दोन तासांनी तुम्हा ऑक्सिजन सपोर्टदेखील गरज भासणार नाही. तसेच रुग्णालयात असल्यास दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देखील मिळेल. अॅलोपथीमध्ये कोरोनावर उपचार नाहीत” असं देखील देवी सिंह भाटी यांनी म्हटलं आहे.