भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गायब असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र आज किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. तसेच संजय राऊतांनी लागलेल्या सर्व आरोपांचे खंडन करून राऊतांवर घणाघाती टीका केली आहे.
सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांसमोर बोलताना केला होता. तर आज सोमय्या यांनी फक्त ११ कोटी जमा झाल्याचे म्हटले आहे. यावरूनच संजय राऊत यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल आधी. Save Vikrant नावावर गोळा केलेल्या पै-पै चे काय केलेस? 58 कोटीचा हिशेब द्यावाच लागेल!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून भाजपचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचा असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ५८ कोटीचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे ११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.