नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपसाल्या. फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
फडणवीस म्हणाले की, हे सरकारी ऑफिस आहे कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. ही खासगी मालमत्ता आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकारात नोटीस बजावली याचा खुलासा करा, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सरकारला दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही सवाल केला आहे. या सरकारचं डोकं फिरलं आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे कोणत्याही ऑफिसात जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार सामान्य माणसाला मिळाला आहे. तोच अधिकार किरीट सोमय्यांनी बजावला.
तसेच कागदपत्रे तपासताना ऑफिसमधील खुर्चीवर बसण्याचाही अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कुणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये असा शब्द वापरत आहे. कारण ही खासगी मालमत्ता आहे, असं फडणवीस म्हणाले.