सायबर सेलकडून राम जन्मभूमिची बनावट वेबसाइट तयार करुन राम भक्तांना लुटणाऱ्या एका टोळीचा सायबर सेलकडून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक केली असून त्यांनी अनेक राम भक्तांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा खुलासा झाला आहे की, हे सर्व आरोपी दिल्लीत राहणारे आहेत. यामधील काहीजण हे सॉफ्टवेअरच्या बिझनेस मधील आहेत.
या संदर्भात पोलिसांनी म्हटले की, दिल्लीतील न्यू अशोक नगर मध्ये राहणारा आशीष, नवीन, सुमित, अमित झा आणि सूरज यांनी मिळून काही महिन्यांपूर्वी एक वेबसाइट तयार केली. या लोकांनी बनावट बेसटाइट तयार करुन बनावटच बँक खात्यांची माहिती देत सामान्य नागरिकांना मंदिरासाठी दान करण्यासाठी अपील केले. यावर शेकडो लोकांनी ऑनलाईन ट्रान्जेक्शनच्या माध्यमातून वेबसाइटवर दिलेल्या खात्याच्या डिटेल्सवर पैसे ट्रान्सफर केले.
या संदर्भात पोलिसांना ही माहिती मिळवली आहे की, या वेबसाइटच्या माध्यमातून आरोपींनी किती रुपये जमा केले आहेत. अयोध्या स्थित वास्तविक राम जन्मभूमि ट्रस्ट संबंधित लोकांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी सायबर सेलला मिळाली. यावर टीमकडून तपास करण्यात आला आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन सिम कार्ड, ५० आधार कार्ड आणि दोन थंब इंप्रेशन मशीन जप्त केले आहेत. तसेच पोलीस पुढील तपस करत आहे.