विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह चिपळूणला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही असे मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखविले होते. तसेच अनेक दिवसांपासून बाहेर दौरा करण्यासाठी पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला नारायण राणे यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना टोला लगावला होता.
ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी पत्रकारांनी केला असता त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून ..आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
दरम्यान, या लोकांचं पुर्णपणे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यांना चागंली पक्की घरं देण्याची योजना राबवली जाईल. राज्य सरकार व केंद्र सरकार दोघेही मिळून परत ही वसाहत चांगल्याप्रकारे बांधतील.इथली शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस विभाग अतिशय़ चांगलं काम करत आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमधून जे लोक वाचलेली आहेत, त्यांना आधार किंवा चांगल्याप्रकारे सांभाळण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू..’ असं देखील नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.