मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणातील आरोपांवरून अटक केली आहे. या कारवाईबद्दल महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहायला मिळत असताना “नवाब मलिक माणूस चांगला आहे” असं वक्तव्य रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवलेंनी केलं.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की ‘आम्हाला सरकार पाडायचे आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. काही आमदारांची चौकशी करून सरकार पाडण्याचा आमचा प्रयत्न या आरोपात तथ्य नाही. नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती.नवाब मलिक माणूस चांगला आहे. परंतु, जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून अटक केली. त्यात भाजप सरकारचा काही संबंध नाही.
कुणाला त्रास द्यावा ही भूमिका आमची नाही. नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकासवाले आहेत. त्यामुळे विकास करा पण भ्रष्टाचार करू नका. कुणाच्याही जमिनी बळकावू नका, असं आठवले म्हणाले.उद्धव ठाकरेंना ऑफर शिवसेनेवर लोक नाराज असून शिवसैनिकांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला आतून विरोध आहे. त्यांना अजूनही वाटते भाजपा सोबत जायला पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यांनी संजय राऊतांच्या भडकवण्याच्या मागे जाऊ नये.