राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी जमीन व्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. मनी लाँड्रिंग चा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ताप आणि अतिसाराच्या तक्रारींवरून सरकारी जेजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरअसल्याचे समजत आहे.मालिकांच्या वकिलाने मुंबईतील विशेष न्यायालयात ही माहिती दिली. रुग्णालयाने सांगितले की मंत्री अतिदक्षता विभागात (ICU) निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात बंद असलेले ६२ वर्षीय नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. तथापि, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिक “कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा” प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.