नवी दिल्ली | राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परप्रांतीय कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतून काँग्रेसतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती मात्र याचमुळे संपूर्ण भारतात कोरोना पसरण्यास मोलाची भर पडल्याचा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता. या आरोपांना आता राष्ट्र्वादीने प्रतिउत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेलाही बनवले प्रचाराचा आखाडा बनवला’ अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. तसंच, लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन चालविल्या होत्या. सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत’ असा पुरावाच राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुळे कोरोना पसरला असा आरोप केला होता.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला ‘चुनावजीवी’ स्वभाव काही सोडलेला नाही. कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे सध्या बिगूल वाजलेले आहे.
त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य योगायोग नक्कीच नाही. वास्तवात एका रात्रीत घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांतून परप्रांतीय श्रमिक आपापल्या गावाला मिळेल त्या साधनाने, प्रसंगी रस्त्याने चालतही गेले. मग पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थितीत केला आहे.