खासदार रामदास आठवले आपल्या अनोख्या काव्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच अनेकवेळा ते विविध विषयावर कविता रचताना दिसून आले आहे. सध्या संसदेत लोकसभेचे कामकाज सुरु असून आठवले यांनी आपल्या शैलीत विरोधकांना धारेवर धरले. केंद्रात जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत कोणाची सत्ता येणे शक्य नाही. तसेच कोणी या बद्दल विचार ही करु नका, मोदी हे तो सब मुनकीन है!
रामदास आठवले म्हणाले की, कोरोना काळात देशात आर्थिक संकट आले, लोकांचे रोजगार गेले. अशा अनेक समस्याना जनेतला समोर जावे लागले आहे. या कठिण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेत्तम काम केल्याने देशातील जनता आणि महिला सर्व स्तरातील लोक खुश आहेत. कोरोना काळात डॉक्टर, पोलिस, वार्ड बॉय, यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा केली. या सर्वाचे रामदास आठवले यांनी धन्यवाद मानले.
कोरोना की आ गई महामारी, ज्याग गई दुनिया की जनता सारी , परेंशान रह गय गाव-गाव की नारी, मेरे उपर भी आ गई थी अडमिट होने की बारी, सभी देश ने बजाई थाली, फिर सरकार को क्यु दे रहो गाली, नरेंद्र मोदी माणूस हे सच्चा, वो राजनीती में नही कच्चा अशी कविता त्यांनी संसदेत बोलून दाखवली होती.