भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात नारायण राणे यांना दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी तापसणी केल्यानंतर नारायण राणेंना अॅजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी काही ब्लॉकेजेस आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी अॅजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.


मग नारायण राणे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आणि तातडीने अॅन्जिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अॅजिओप्लासीट शस्त्रक्रिये दरम्यान काही ब्लॉकेजेस होते ते काढण्यात आले आहेत.


सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज आणि उद्या नारायण राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल आणि त्यानंतर प्रकृती पाहून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. वाचा : राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात संभाजीराजेंनी केली मोठी घोषणा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातही नारायण राणे रुग्णालयात दाखल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गेल्यावर्षी सुद्धा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. रुटीन चेकअपसाठी राणे रुग्णालयात गेले होते.
