देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनलॉक परिस्थिती, वाढलेली गर्दी, ठिक-ठिकाणी होणारा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क वावरणे नागरिक यांसह इतर कारणांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात नागपूर आणि पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे.
यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. लॉकडाउन हा पर्याय नाही, मात्र नागपूरमध्ये सात दिवस लॉकडाउन केला आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावला पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही’ असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
नागपुरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक बोलावली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातही बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार बैठकीला उपस्थित होते. तसेच फडणवीसांनी काही सूचना सुद्धा केल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे.
विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे. त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आलात, यावर तोडगा या बैठकीत काढला जाईल, जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाउन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाउन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले.