ठाणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड सतत वादग्रस्त विधाने करून एकच खळबळ उडवून देताना अनेकदा दिसून आले आहेत अशातच आता त्यांच्या या दाव्यामुळे नव्य चर्चांना उधाण आले आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाची सध्या राजकीय वारुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या वॉर्डरचनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महापालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत हा आरोप केला आहे . आघाडी करण्याची आपली इच्छा आहे, मात्र तुमची इच्छा नसेल तर काय करणार असा सवालदेखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे माझाच राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे मी बचावात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच आपल्या मतदारसंघातील जागा २३ वरून १८ वर आणत कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रापर्यंत नेण्यात गेला. पालकमंत्र्यांकडून असा प्लॅन केला जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या मनानेच केले असावे. तसेच एकूण २४ जागांपैकी सात हिंदू जागा आहे. यातून मुस्लिम द्वेषाचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे असे त्यांनी यावेळी म्हणून दाखविले होते.