केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआर्शीवाद यात्रेला कालपासून मुंबईतून सुरूवात केली. यात्रा सुरु करण्यापुर्वी नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं होतं. मात्र नारायण राणे निघून गेल्यावर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं गोमूत्र आणि दुग्धभिषेक घालून शुद्धीकरण केलं आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यावर आता नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणेंनी जोरदार केली आहे.शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण केल्यानंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, ”अडवण्याची भाषा करणारे गोमुत्रावर आले आहेत. म्हणून पुढच्यावेळी चड्डीत राहायचं.” आता नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागेल.
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाची देखरेख करणारे आप्पा पाटील यांनी दुग्धाभिषेक त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण केलं. शुद्धीकरणानंतर तिथं फुल वाहण्यात आली. नारायण राणे सकाळी दर्शनासाठी आले होते. त्यामुळे ते गेल्यावर हे शुद्धीकरण केलं असल्याचं बोललं जात आहे. या शुद्धीकरणावेळी आप्पा पाटील आणि सेना कार्यकर्ते उपस्थित होते.
आज ही वास्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे तिथे दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण करण्यात आलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला आणि बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं वाहण्यात आलीत. राणेंना इतके दिवस शिवसेना दिसली नाही. सेनेला सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नाहीत, अशा शब्दात आप्पा पाटील यांनी राणेंवर निशाणा साधला.