सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाह्यला मिळत आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा देखील दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘अनेकदा सरकारला कोरोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी कोरोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी कोरोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.’ आज कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.’ असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
सोशल डिस्टंन्सिंग व मास्क देखील तात्पुरते उपाय आहेत. लस कायमचा उपाय आहे. पण जर का तुम्ही लस लवकर घेतली नाही, तर विषाणून आपल्या लसीच्या पकडीतून सटकून जाईल. कारण, जर तुम्ही विषाणूला भारतात चालू दिलं, रोखलं नाही. तर तो बदलत राहील व घातक बनेलअसं देखील राहुल गांधींनी बोलून दाखवलं. तसेच जर भारताने लसीकरणाचे योग्य नियोजन केले नाही तर एकदा नाही तर अनेकदा लोकं मरतील. एक-दोन लाटा नाही येणार तर लाटा येतच राहातील. कारण विषाणू बदलत राहील.’ असा इशारा देखील यावेळी राहुल गांधींनी दिला.