देशात एकीकडे १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याच्या मुद्दयावरून देशभरात भारतीय जनता पक्षाकडून तसेच मोदी सरकारकडून उठसव साजरा करण्यात येत असताना आता दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीच्या मुद्दयावरून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे, यावर बोलताना काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकर्व्हर जोरदार टीका केली आहे.
देशात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा साजरा केल्यानंतर आता इंधन दरवाढीची शंभरीही साजरी करावी, असं म्हणत पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वीच लीटरमागे पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत आणि आता डिझेलच्या किंमतीनं लीटरमागे 100 रुपयांचा टप्पा गाठलाय, असं म्हणत चिदंबरम यांनी इंधन दरवाढीवरुन संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी इंधन दरवाढ मोठा चिंतेचा विषय बनला आहे