मुंबई | पैसे महिन्याभराचे आणि रिचार्ज फक्त २८ दिवसांचा का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी थेट टेलिकॉम कंपन्यांना पत्र व्यवहार करून विचारला होता. तसेच एमएनटीस’च्या या मागणीला अनेक सामान्य नागरिकांनी पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र या मागणीला यश आलेले दिसून येत आहे.
यापुढे टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन द्यावा असे आदेश ट्राय’ने (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे वर्षभरात एका महिन्याच्या रिचार्ज प्लानचे पैसे ग्राहकांचे वाचणार आहे. सदर मागणी काही महिन्यांपूर्वी एमएनटीस’ने उचलून धरली होती. तसेच याच मुद्द्यावर आंदोलनाची हाक सुद्धा दिली होती.
मात्र आता एमएनटीसच्या मागणीला यश आलेले दिसून येत असून संघटनेने ट्राय )भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) बरोबर केलेल्या पत्रव्यवहाराला यश आलेले दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना एमएनटीस सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर म्हणाले की, आजवर कंपन्यांनी २८ दिवसांचा रिचार्ज देत ग्राहकांकडून पुन्हा महिन्याचे पैसे वसूल केले आहे. तसेच अक्षरशः ग्राहकांची लूटच केली आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही महिन्याभराचे पैसे ग्राहकांकडून घेता तर त्यांना २८ दिवसांची सेवा का पुरवता त्यामुळे ग्राहकांना वर्षाकाठी १३ वेळा रिचार्ज करावा लागत आहे. त्यामुळे वर्षाच्या १२ महिन्यात १३ व्या महिन्याचा रिचार्ज मारून एका महिन्याचे पैसे ग्राहकांना विनाकारण टेलिकॉम कंपन्यांना द्यावे लागत आहेत असे मत त्यांनी बोलताना मांडले आहे.
