नवी मुंबई | मनसे शहर अद्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले होते. या आरोपणानंतर गजानन काळे आणि मनसेवर सर्वबाजूंनी जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर महाविकास आघाडीच्या महिला जमा झाल्या आहेत.
गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र चार दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांकडून आयुक्तालयाबाहेर जमावाला अडवले आहे.मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करूनही काळेंना अटक न झाल्याने संतप्त महिला पोलीस आयुक्तालयासमोर धडकल्या आहेत.