राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार चक्क दरेकरांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर भेट झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
सध्या राज्यातील विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहे. त्यात मनसुख हिरेन, सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्षाने आघाडीच्या अडचणी अधिक वाढवल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये रोहित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालकही आहेत. रोहित पवार यांचे त्यासंबंधित काही काम होतं काअसा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. तसेच या भेटीची माहिती दरेकर यांनी ट्विटरवरून दिलेली आहे.